Shishu Pujan Seva

501.00

Shishu Poojan Seva:
Day:Every Day
Shishu Poojan pooja is ardently performed for a child and the mother’s good health and to bless them with the strength to overcome any difficulty in life. The Pooja is performed by the father who humbly seeks blessings from Maa Saraswati for an enriching education for his child. This Pooja is an appeal to Maa Saraswati - an incarnation of Goddesses Siddhi and Buddhi, and Lord Ganesha which is very beneficial to the child and his/her mother.

Rituals:During the Pooja, father recites ‘Panchvakyatmak Punyahwaachan’ which is the Panchopchar worship of Lord Ganesha and Lord Varuna. After that, Aarti is performed for the baby, his/her mother and father.
The following Mantra is recited in the Shishu Poojan – गौरीपुत्रौ यथा स्कन्द शिशुत्वे रक्षितः पुरा तथा ममाप्युयं बालं षष्ठिके रक्ष ते नमः॥ This mantra seeks protection for the baby and prosperity in education from Morya and his brother Skanda. Shishu Poojan is specially performed at Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple with fervor. Devotees are encouraged to benefit from this Seva and seek beloved Bappa’s blessings for infants and their mothers.

Special Note: If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

शिशु पूजन सेवा:
दिवस:दररोज
शिशूपुजनाचा संकल्प हा पित्याकडून होतो तो खालील प्रमाणे माता व शिशु यांना उत्तम आरोग्य व भविष्यात येणारी अरिष्ट निरसनार्थ व शिशुला विद्या सरस्वती यांची अनुकूलता व्हावी हा संकल्प होतो. ह्या ठिकाणी आवर्जुन सांगावयास वाटते विदया,सरस्वती म्हणजेच सिद्धी बुद्धी ह्यांचे अधिष्ठित देवता आपले गणपती बाप्पा आहेत त्यांचे पुढे शिशु पूजन करणे अर्थातच दुग्ध शर्करा योग.

पुजनविधी: शिशु पूजनामध्ये पंचवाक्यात्मक पुण्याहवाचन करावे लागते. म्हणजे गणपती व वरुण ह्यांची पंचोपचार पूजा करतात. व नंतर बाळ, त्यांचे माता व पिता ह्यांना औक्षण करतात. शिशुपूजना मध्ये पण खालील मंत्र आहे गौरीपुत्रौ यथा स्कन्द शिशुत्वे रक्षितः पुरा तथा ममाप्युयं बालं षष्ठिके रक्ष ते नमः॥ या मंत्राचा अर्थ असा कि गौरी पुत्र म्हणजेच मोरया व त्यांचे बंधू स्कन्द हे माझ्या बाळाचे रक्षण करोत व विदयाभ्यासात प्रगती करोत असा आहे. पुण्य नगरीतील आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शिशुपूजन हि सेवा भक्तांकरीता केलेली आहे कृपया लाभ घ्यावा.

विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.