श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,
सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, संस्कृत प्राकृत विभाग आणि
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
अभूतपूर्व आणि संपूर्ण नि:शुल्क उपक्रम,
व्यक्तिमत्व विकासाचा राजमार्ग
श्री गणेश अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम

ह्या उपक्रमात/ अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी ह्या वेबसाईटवर नामांकन (Registration) करणे आवश्यक आहे.


* हा अभ्यासक्रम २१ भागांचा आहे व तो भागांच्या क्रमानेच पूर्ण करता येईल.
* प्रत्येक भागाचा एक व्हिडीओ व त्या भागाची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.
* प्रत्येक प्रश्नमालिकेतील सर्व प्रश्न त्या भागांच्या व्हिडीओ व माहितीवर आधारित असतील.
* अभ्यास झाल्यानंतर पानाच्या खाली 'चाचणी सुरु करा' ह्या बटणावर क्लिक करून त्या दिवसाची प्रश्नमालिका सोडवता येईल.
* मात्र आपल्याला प्रश्नमालिका सोडवण्यासाठी काल मर्यादेचे कोणतेही बंधन नाही.
* आपण आपल्या सोयीने कधीही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.
* प्रश्नमालिकेतील एकही प्रश्न अपूर्ण ठेवून पुढच्या दिवसाकडे जाता येणार नाही. दहाही प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
* प्रश्नमालिकेतील दहाही प्रश्न सोडवल्यानंतर ‘सबमिट’ या बटणावर क्लिक करावे.
* त्यानंतर आपल्याला ‘सारांश’ अशी चौकट दिसेल.
* त्या चौकटीमध्ये आपल्याला
१) किती गुण मिळाले?
२) कोणती उत्तरे चुकली?
३) त्यांचे बरोबर उत्तर काय होते?
४) किती वेळा प्रश्नमालिका सोडवण्याचा प्रयत्न केला?
या सगळ्या गोष्टी आपोआप दिसतील.
* अशा स्वरूपात २१ भागांच्या २१ प्रश्नमालिका आहेत.
* प्रश्नमालिकेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५ उत्तरे अचूक येणे आवश्यक आहे. तरंच विद्यार्थी पुढच्या भागाकडे जाऊ शकतील.
* उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नमालिका केवळ ३ वेळा सोडवण्याची संधी मिळेल.
* विद्यार्थ्यांनी ३ प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे.
* ३ प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण न झाल्यास विद्यार्थी १५ दिवसांनंतर पुन्हा परीक्षा देऊ शकेल.
* १५ दिवसांच्या कालावधीमध्ये विद्यार्थी केवळ दिवसाच्या अभ्यासक्रमाची माहिती वाचू शकतील आणि व्हिडीओ पाहू शकतील. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवसाची प्रश्नमालिका ‘सबमिट’ केल्यानंतर ‘उत्तीर्ण’ असल्यास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 'प्रमाणपत्रासाठी अर्ज करा' या बटणावर क्लिक करा.
* नोंदणी झालेल्या ई- मेल आय. डी. वर आपणास आपल्या ई- मेलवर प्रमाणपत्र प्राप्त होईल.
* या अभ्यासक्रमामध्ये कोणत्याही धार्मिक पूजेचे विवेचन नाही.
* हा अभ्यासक्रम केवळ व्यक्तीमत्व विकासासाठी पूरक असा आहे.
* कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास
- श्री. नितेश चामटे ९८५०३७७५८३
- मोहित चांदोरीकर ९९२२७८२२१०
- ज्ञानेश कुलकर्णी ९८६०६२०२७७ या WHATSAPP (व्हॉट्स ॲप) क्रमांकावर संपर्क साधावा.