Shri Ganpati Sukta Abhishek

501.00

श्री. गणपती सुक्त अभिषेक 
 दिवस : मंगळवार विधी: १ अथर्वशीर्ष आवर्तन, ५ सुक्त गणेश पठण अभिषेक, श्रींची आरती, प्रसाद. वेळ: सकाळी ६ ते सायं. ५ या वेळेत अभिषेक करण्यात येईल. प्रत्येक अभिषेकास १ तासाचा कालावधी लागेल. 
 पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती. 

 विशेष सूचना : शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ- सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.